शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक, खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 2:42 AM

११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे.

पनवेल : जास्त परताव्याचे आमिष दाखवून व पंचवीस हजार रुपये भरून २० लाख रुपयांचे कर्ज देतो, असे सांगून ११७ जणांची ५७ लाखांची फसवणूक केल्याचे नवीन पनवेल परिसरात उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.अल्फा गोल्ड फायनान्स कंपनीचे मालक मुकरम अली अन्सारी व रेखा कांबळे यांनी वेळोवेळी नाव बदलून पंचवीस हजार रुपये भरून कर्ज देतो, असे नागरिकांना सांगितले होते. संगीता धारू राठोड यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांना अली यांनी त्याचे नाव महंमदअली असे सांगितले. तर रेखा कांबळे ही त्याचे नाव मनीषा व कलिका असे सांगायच्या.मुकरम अली अन्सारी उर्फ मोहम्मद अली अन्सारी उर्फ एमएम अशी नावे सांगून त्याने मे. अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे मालक असल्याचे तसेच या महिलेने स्वत:ची ओळख कंपनीची ग्रुप लीडर म्हणून रेखा कांबळे उर्फ मनीषा गमरे उर्फ कलिका कांबळे अशी सांगितली.अल्फा गोल्ड या फायनान्स कंपनीचे हेड आॅफिस १३१, एम.जी. रोड, अमीरगंज, न्यू दिल्ली येथे असून नमूद फायनान्स कंपनीची स्विस ९९९.२४ कॅरेट गोल्ड, झुरीच, स्वित्झर्लंड येथे शाखा असल्याचे नागरिकांना सांगत असत. ही फायनान्स कंपनी २० लाख रुपयांपर्यंत पर्सनल व बिझनेस लोन देते, असे सांगून या कंपनीमध्ये सभासद होण्यासाठी सुरुवातीला २० हजार रुपये रक्कम ठेव म्हणून जमा करावी लागेल तसेच सभासदाकडून स्वीकारलेली रक्कम ते शेअर मार्केटमध्ये गुंतवितात. त्यानंतर कंपनी तत्काळ सभासद झालेल्या व्यक्तीला लाभांश म्हणून विनापरतावा २० लाख रुपयांपर्यंत पर्सनल व बिझनेस लोन देते, असे सांगून त्या दोघांनी शेकडो नागरिकांकडून लाखो रुपये जमा केले व त्यातील प्रत्येकाला १५ लाख रुपये डिमांड ड्राफ्टद्वारे मिळतील, उर्वरित ५ लाख रुपये रोखीने मिळतील, असे सांगितले होते.कंपनीच्या ग्रुप लीडर रेखा कांबळे यांना हे ५ लाख रुपये कमिशन म्हणून द्यावे लागेल, असे सांगून पैसे गुंतवणूक केलेल्या प्रत्येकाला प्रत्येकी १५ लाख रुपयाच्या डिमांड ड्राफ्टच्या छायांकित प्रती दिल्या व त्यांची फसवणूक केली. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन वपोनि एस. शिंदे यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई