लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मेट्रो कामाचे ठेकेदार जे कुमार यांच्या मीरारोडच्या कामगार निवास ठिकाणी पट्टे खेळत असताना पैसे नेल्यावरून कामगारां मध्ये तुंबळ राडा झाला . लोखंडी सळई , रॉड व दांड्याने हल्ला चढवल्याने त्यात तिघेजण जबर जखमी झाले असून काशीमीरा पोलिसांनी ५ जणांना अटक केली. आणखी ५ जण फरार असून अटक आरोपीना २५ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .
भाईंदर - दहिसर मेट्रो मार्गिका क्रं. ९ चे काम शहरात सुरु असून ठेकेदार जे कुमार ह्यांनी कामगारांच्या राहण्यासाठी मीरारोडच्या प्लेझन्ट पार्क भागात व्यवस्था केली आहे . ह्या कामगार निवास छावणीत काही गट असून किरकोळ भांडणे - वादावादी नेहमीची असल्याचे सांगितले जाते .
सोमवारी टप टीमचा कामगार हा एका बरोबर पत्ते खेळत असताना ८ हजार रुपये घेऊन निघून गेलाने वाद झाला होता . त्यातूनच मंगळवारी रात्री टप टीमच्या ८ ते १० कामगारांनी अन्य कामगार दरोगा , राजमणी व गौतम ह्यांना लोखंडी सळई , रॉड व दांड्याने जबर मारहाण केली . त्यात ते गंभीर जखमी झाले . त्यांना रात्रीच कांदिवलीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले .
काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हत्येचा प्रयत्न सह विविध कलमां खाली गुन्हा दाखल करून घेत मोहम्मद आलम, राजा उर्फ मोहम्मद, सद्दाम हुसैन, समीर सिंह, शमीम उर्फ इकबाल हुलीअल्ला ह्या ५ जणांना अटक केली आहे . त्यांना बुधवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता २५ नोव्हेम्बर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे . पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक टिकाराम थाटकर हे करत आहेत.