प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, पण ते खरंच असतं का? गुजरातमध्ये घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न तुम्हाला नक्की विचार करायला लावणारा आहे. अनेकदा प्रेमी जोडप्यांनी पळून जाऊन लग्न केल्याचं आपण ऐकलं असेल पण छानी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलामुलीने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. गुजरातमधील छानी येथे राहणाऱ्या या मुलांनी घरातून ३० हजार रुपये घेऊन पसार झाले आणि १३ दिवसांच्या शोधानंतर पुन्हा घरी परतले.
कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत, ९ वी शिकणारे हे दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात, वर्षभरापासून भेट झाली नाही, सतत आठवण येतेय म्हणून मुलांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला असं पोलिसांच्या माहितीनुसार कळाले, या दोघांनाही कपलप्रमाणे एकत्र राहायचं होतं, एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्ताप्रमाणे दोघांनी २८ डिसेंबरला घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला, त्यासाठी मुलाने घरातील मंदिरात ठेवण्यात आलेले २५ हजार आणि मुलीने ५ हजार चोरी केले. जेव्हा कुटुंबाला या मुलं सापडली नाहीत तेव्हा त्यांनी छानी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंद केली.
घरातून पळाल्यानंतर दोघंही रानोली रेल्वे स्टेशनला गेले होते, त्याठिकाणी कोणतीही ट्रेन मिळाली नाही, मग तेथून दोघं सयाजीगुंज येथे गेले. त्यानंतर वापीला जाण्यासाठी खासगी टॅक्सी बूक केली, मुलाला वापी येथील बरीच माहिती होती, कारण तो कुटुंबासोबत त्याठिकाणी अनेकदा गेला होता. वापी पोहचल्यानंतर तेथे या दोघांनी ५०० रुपये भाड्याने एक खोली घेतली आणि लव्ह इन रिलेशनप्रमाणे राहू लागले.
जेव्हा घरातून आणलेले पैसे संपले तेव्हा मुलाने एका कपड्याच्या दुकानात नोकरी केली, ज्याठिकाणी त्याला दिवसाला ३६६ रूपये मिळत होते, काही दिवसांपूर्वी मुलाने आपल्याला मित्राला संपर्क केला तेव्हा पोलिसांना याबाबत माहिती मिळाली, पोलिसांनी वापीमध्ये या दोघांचा शोध घेतला आणि त्यांना वडोदरा येथे आणले. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवले तर मुलाला क्वारंटाईन करण्यात आलं.