राजस्थानमधील जयपूरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. एका शिक्षिकेने एका निष्पाप विद्यार्थ्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण केली की मुलाच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. विद्यार्थ्याने गृहपाठ केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे शिक्षिकेला राग आला. शिक्षिकेने आधी विद्यार्थ्याला जमिनीवर फेकलं आणि नंतर काठीने मारहाण केली. त्यामुळे विद्यार्थ्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या एका डोळ्याला 12 टाके पडले असून दोन डोळ्यांच्या शस्त्रक्रियाही करण्यात आल्या आहेत. असे असूनही विद्यार्थ्याला एका डोळ्याने अजिबात पाहता येत नाही. या घटनेनंतर सुमारे दीड महिन्यानंतर पीडितेचे कुटुंबीय आरोपी शिक्षिकेविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. 8 वर्षीय फजल हा जयसिंगपुरा खोर भागातील लिटल डायमंड एकेडमीचा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी आहे.
गृहपाठ न केल्याने शाळेतील शिक्षिका आयशाने मुलाला बेदम मारहाण केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मारहाणीमुळे मुलगा जोरजोरात रडू लागला तेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाने मुलाच्या आजाराची माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेले. जिथे फजलच्या डोक्याला अंतर्गत दुखापत झाल्याने एक्स-रे काढण्यात आले. डोळ्यात गंभीर दुखापत दिसली असता डोळ्याला 12 टाके आहेत. दोन शस्त्रक्रिया करूनही विद्यार्थ्याला काहीच दिसत नव्हते.
फजलने सांगितले की त्याने गृहपाठ केला नाही. त्यानंतर आयशा मॅडमने त्याला काठीने मारले, एका डोळ्याला दुखापत झाली. त्यानंतर पालकांनी त्याला दवाखान्यात नेले पण तो अजूनही एका डोळ्याने पाहू शकत नाही. दुसरीकडे, फजलचे वडील नावेद यांनी सांगितले की, मुलगा दोन महिन्यांपासून शाळेत जात नाही. त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून 12 टाके पडले आहेत. एवढेच नाही तर दोन शस्त्रक्रियाही झाल्या असून आता तिसरी शस्त्रक्रिया फेब्रुवारीत होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"