डोंबिवली - दिवा - वसई रेल्वे लाईन जवळीलं एका झुडपात एका अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला होता. या हत्येप्रकरणी मानपाडा पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा नोंदविला होता. या हत्येप्रकरणी सौदागर तांडी (२५) या मारेकऱ्याला अटक करण्यात कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. मृतदेहाच्या हातावर `लुचन` असे शब्द गोंदविलेले होते.
लुचन लिंगा सुना असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. मारेकरी सौदागर तांडी (२५) आणि लुचन हे एकमेकांच्या ओळखत होते. दोघेही ओरिसा राज्यातील राहणारे होते. एका नवीन इमारतीच्या बांधकाम ठिकाणी बिगारी म्हणून काम करत होते. हे दोघेही याच ठिकाणी राहत होते. लुचन याने सौदागर याचे दोन वेळेला पैसे चोरले होते. याचा राग मनात धरून दारू पिऊन या ठिकाणी झोपला असताना सौदागर याने लुचन याचे तोंड दाबून गळा चिरून हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी सौदागरने लुचनचा मृतदेह मानपाडा येथील नांदिवली येथील दिवा-पनवेल रेल्वे लाईनजवळील झुडपात टाकले होते.या गुन्हाची सौदागर याने पोलिसांकडे कबुली दिली आहे.
या प्रकरणाचा तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन मुडगून, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस नाईक प्रकाश पाटील, पोलीस नाईक राजेंद्र घोलप यांच्या पथकाने केली आहे.