शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विनाकारण घराबाहेर पडू नका! कलर कोडची मुंबई पोलिसांकडून आजपासून काटेकोर अंमलबाजवणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 3:36 PM

Mumbai police commissioner Hemant Nagrale : आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत. 

ठळक मुद्देमेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले.

मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शनिवारी एक व्हिडिओ संदेश जारी करत कलर कोड सक्तीची घोषणा केली. संचारबंदी काळातही मुंबईतील रस्त्यांवर काही वाहनांचा मुक्तसंचार सुरू असल्याने तसेच वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. 'कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच परवानगी दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठी हे तीन कलरचे कोड बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड असणार आहे. कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाणार, असे हेमंत नगराळे यांनी सांगितले. तसेच आज दहिसर चेक नाक्यासह अनेक चेक पॉंईंटसवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भेटी देऊन आजपासून कलर कोडची कडक अंमलबजावणी कारण्यास पोलिसांना आदेश दिले आहेत. 

कलर कोड पद्धतीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराचे प्रमुख एंट्री पॉइंट तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या नाकाबंदीत स्टिकरशिवाय असणाऱ्या गाड्या अडवून तपासणी केली जाणार आहे. कलर कोड नसेल मात्र वाहन अत्यावश्यक सेवेसाठी चालवले जात असेल तर कागदपत्र तसेच इतर शहानिशा करून त्या वाहनाला कोड दिला जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, जे लोकं या कलर कोडमध्ये मोडत असतील आणि त्यांनी हे कलरचे स्टिकर पोलीस देतील याची वाट न पाहता ते स्वतःही कार्डपेपर किंवा गोटी पेपरचा वापर करून स्टिकर लावू शकतात. मात्र, स्टिकर लावलेल्या वाहनाला पोलिसांना अडवून त्याबाबतचे ओळखपत्र दाखवणे अत्यावश्यक असेल, असे नगराळे पुढे म्हणाले.

विनाकारण फिरणाऱ्यांना वेसण घालण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या खासगी वाहने स्वतःहून सहा इंच आकाराचा योग्य त्या रंगाचा गोल स्टिकर लावून शकतात अन्यथा स्थानिक पोलीस ठाणे किंवा नाकाबंदीच्या ठिकाणी पोलिसांमार्फत मोफत कोडचे स्टिकर दिले जाणार आहेत.लाल रंग - डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी वर्ग, ऍम्ब्युलन्स, लस केंद्र, खासगी लॅब, औषध उत्पादन कंपन्या, केमिस्ट, आरोग्य विमा कंपन्या, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित इतर उत्पादन, वितरण करणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारीहिरवा रंग - खाद्यपदार्थ म्हणजेच किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी उत्पादने, बेकरी उत्पादने, खाद्यपदार्थ बनविण्यासाठी लागणारा साहित्याची वाहतूक करणारी वाहनेपिवळा रंग - केंद्र, राज्य सरकारी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, प्रसारमाध्यमे, पाणीपुरवठा, विद्युत आणि गॅस पुरवठा करणारी वाहने, सरकारी आणि खासगी सुरक्षा एजन्सी, बँक तसेच एटीएममध्ये रोकड पोहचविणारी वाहने, पोस्ट आणि पेट्रोलियम कंपन्यांची वाहने

टॅग्स :Hemant Nagraleहेमंत नगराळेPoliceपोलिसcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई