रायपूर - छत्तीसगडच्या बिलासपूरमधील एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर मुंबईला गेलं. तिथून हे पती-पत्नी हनीमूनसाठी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे गेले. मात्र हनिमूनहून परत येताच विवाहाचा आनंद कौटुंबिक वादात बदलला. डॉक्टर असलेल्या पत्नीने पतीच्या पुरुषार्थावरच शंका उपस्थित केली. पत्नीने आपल्या मित्र आणि पतीच्या सहकाऱ्यांना फोन करून माझा पती गे आहे, असे सांगण्यास सुरुवात केली. आमच्यामध्ये विवाहानंतर कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत, असा दावाही तिने केला. सुमारे ३ वर्षे जुन्या या प्रकरणाची चर्चा गेल्या सोमवारपासून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमामात होत आहे. (Coming from the honeymoon, the female doctor said my husband is gay, the husband told the court Bournevita connection, what exactly is the case?)
त्याचे झाले असे की, बिलासपूरमधील रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरचा विवाह २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात एका तरुणाशी झाला. लग्नानंतर हा तरुण डॉक्टर पत्नीला घेऊन मुंबईला गेला. त्यानंतर हे दोघेही हनिमूनसाठी जयपूरला गेले. मात्र हनिमूनहून परत आल्यानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. डॉक्टर पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले. तिने आपल्या ओळखीमधील सर्वांना आपला पती गे असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. तसेच तिने पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला.
पत्नीच्या या आरोपांमुळे पतीची बदनामी होऊ लागली. तसेच त्याचे मित्र त्याच्याकडे हीन नजरेने पाहू लागले. त्यानंतर या पतीने रायपूरमधील एका कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल केला. पतीने पत्नी आणि तिच्या अन्य एका नातेवाईकाविरोधात आरोप केले. त्यानंतर गेल्या सोमवारी रायपूरच्या कोर्टाने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात समन्स बजावले.
याबाबत पतीने कोर्टात सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईला असतो. विवाहानंतर तो डॉक्टर पत्नीला घेऊन मुंबईत गेला. पत्नी दिवसभर घरात काहीही काम करत नसे. तसेच तिच्या फोनवर बोर्नविटा नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर तासनतास गप्पा मारत बसे. पतीने कोर्टात सांगितले की, बोर्नविटा नावाने सेव्ह असलेला हा नंबर डॉ. विवेक उपाध्याय याचा आहे. कॉलेजपासून पत्नी आणि त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळेच पत्नी विवाहानंतरही बिलासपूर येथे राहण्यासाठी आग्रही होती. मात्र मी कॅनडाला जाऊ इच्छित होतो.
पतीने कोर्टात सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून माझ्या सहकाऱ्यांना मी गे असल्याचे सांगितले. तसेच विवाहानंतर आमच्यात कुठलेही संबंध प्रस्थापित झाले नसल्याचे सांगितले. ही गोष्ट हळूहळू ऑफिसमध्ये पसरली. त्यामुळे ऑफिसमधील सहकारी माझ्याकडे हीन भावनेने पाहू लागले. पतीने त्याच्या पत्नीवर मद्यपान करून गोंधळ घातल्याचाही आरोप केला. अभिनव याने आपली वैद्यकीय चाचणी करून रिपोर्ट कोर्टात सादर केला. त्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना महिलांशी शरीरसंबंध ठेवण्यास फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.
दरम्यान, सदर पतीने पत्नीची मोठी बहीण, भाओजी आणि मोठा भाऊ व वडील यांच्याविरोधात भादंवि २०० कलम ५००/३४ अन्वये तक्रार दिली. त्यावरून कोर्टाने सदर महिला डॉक्टर आणि अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून समन्स जारी करण्याचा आदेश दिला.