शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

लायकी काढणाऱ्या दीपक केसरकरांविरोधात पीडित महिलेने केली पोलिसांत तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:18 PM

 "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचे नाही" असे म्हणत दोघींना देखील केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 

मुंबई - आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गेले अनेक दिवस मंत्रालयात खेटे मारणाऱ्या सामूहिक बलात्कार पीडित आणि तिच्या मुलीशी बोलताना गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची जीभ घसरली. न्याय मागण्यासाठी गेलेल्या या पीडित महिलेला सर्वांसमोर "तुमची लायकी काय आहे. जास्त बोलायचे नाही" असे म्हणत दोघींना देखील केसरकर यांनी त्यांच्या दालनातून हाकलून दिल्याचा संतापजनक प्रकार काल सायंकाळी घडला. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. 

मूळची जळगावची असलेली पीडित महिला सध्या कल्याण परिसरात राहते. मे २०१७ मध्ये कल्याणच्या मांडा परिसरात राहणाऱ्या या पीडितेवर सात जणांनी प्रसादात गुंगीचे औषध देऊन पीडितेवर आणि तिच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार नोंदविण्यासाठी उंबरे झिजवले. मात्र, पोलिसांनी टाळाटाळ करत तब्बल दीड महिन्यानंतर तक्रार नोंदवली. या प्रकरणात स्थानिक राजकिय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यामुळे पोलिसांनी गुन्ह्यात सात आरोपींपैकी एकावरच गुन्हा दाखल करत इतरांना अभय दिले. या आरोपींकडून पीडितेला वेळोवेळी पाठलाग करून गुन्हा मागे घेण्यासाठी धमकावले जात होते. त्यामुळे मागील सहा महिन्यात महिलेच्या कुटुंबियांना पाच वेळा घर बदलावे लागले आहे.  आपल्याला न्याय मिळावा, या गुन्ह्यातील इतर आरोपींवर ही गुन्हा नोंदण्यात यावा आणि त्यांना ही अटक व्हावी.  यासाठी मागील काही महिन्यांपासून पीडित महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी मंत्रालयातील विविध मंत्र्यांकडे येरझाऱ्या घालत आहेत. मात्र, आतापर्यंत तिला फक्त आश्वासनेच  मिळत आली.  

अखेर हे प्रकरण घेऊन पीडित महिलाही कुटुंबासह राज्याचे ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे गेली होती. या प्रकरणात केसरकर यांनी त्यांना आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्यामुळे सोमवारी सायंकाळी पीडित महिला पुन्हा केसरकर यांना भेटण्यासाठी गेली. त्यावेळी पीडितेने त्यांना घडलेला प्रकार आणि पोलिसांची कूचकामी भूमिका सांगितली. त्यावर केसकरांनी आवाज चढवून उपस्थितांसमोर "तुम्हची लाईकी काय आहे. आमच्या येथे येण्याची, असे बोलून दालनातून हाकलून लावले. या प्रकरणी पीडित महिलेने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ग्रामीण विभागाचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सोमवारी रात्री लेखी तक्रारीत हे आरोपी पीडितेने केले आहेत.

कथित पीडित महिला तिच्या पतीसह आज माझ्या दालनात आली होती. तिची व्यथा ऐकून मी तिच्यासमोरच ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षकांना फोन लावला. सदर महिलेच्या तक्रारीसंदर्भातील सर्व माहिती घेऊन मला भेटण्यासाठी या, असे मी पोलीस अधीक्षकांना सांगत असतानाच महिलेचा पती पोलीस अधीक्षकांना शिवीगाळ करू लागला. मी त्याला समजावले पण त्याचे अर्वाच्य भाषेत बोलणे सुरूच होते. तेव्हा मी त्याला निघून जाण्यास सांगितले.- दीपक केसरकर, गृह राज्यमंत्री

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणDeepak Kesarkarदीपक केसरकर kalyanकल्याण