ठाणे - आयआयटीच्या पहिल्या वर्षाला विद्याथ्र्याचे २०१९ मध्ये मोठया प्रमाणात शुल्क आकारुन त्यांना शिक्षण न दिल्याने अमृत देसाई (४६, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या पालकांसह दहा पालकांनी राव आयआयटी संस्थेविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी २३ लाख २४ हजार ९४० रुपये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
देसाई यांच्या तक्रारीनुसार ठाण्यातील राव ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि राव अॅकॅडमी तसेच त्यांचे ट्रस्टी संचालक बी. व्ही. राव , विनयकुमार पांडे आणि यामिनी पांडे यांनी आपसात संगनमत करुन यातील नऊ विद्याथ्र्याना सायन्स आणि आयआयटी शाखेत मे २०१९ मध्ये प्रवेश दिला. त्यासाठी मोठया प्रमाणात शुल्क आकारुन केवळ तीन महिने त्यांना शिक्षण दिले. त्यानंतर पगार न मिळाल्याने शिक्षकांनी या मुलांना शिकविले नाही. त्यामुळे विद्याथ्र्यानी नाईलाजास्तव हे कॉलेज सोडल्याचा दाखला ७ फेब्रुवारी २०२० रोजी घेतला. राव आयआयटीतूनही जुलै २०२० मध्ये या विद्याथ्र्यानी कॉलेज सोडल्याचा दाखला घेतला. स्वीकारलेल्या फीचा परतावा देतो असे पालकांना सांगून तो देण्यात आला नाही. अखेर देसाई यांची दोन लाख ९८ हजार २० रुपयांची आणि इतर नऊ पालकांची मिळून २३ लाख २४ हजार ९४० रुपयांची फसवणूक केल्याचे ११ मार्च २०२० रोजी त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी कलम ४२० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. हे संपूर्ण प्रकरण आता ठाणे गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.