अहमदनगर: तु हमारे खिलाफ मुख्यमंत्री को बहुत कॅम्पलेट करता है, असे म्हणत नरमधील वकीलास शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी ( दि. ११) नगरमध्ये घडली. याप्रकरणी ७ ते ८ अज्ञात इसमांविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुश्ताक अहमद सय्यद राजासाहब ( रा. पंचपीरचावडी, माळीवाडा) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी रात्री पावने दहा वाजेच्या सुमारास अचानक घरावर दगड पडल्याचा आवाज येऊ लागला. घराचा दरावाजा उघडून पाहिला असता ७ ते ८ अनओळखी इसमांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाच्या हातात कोयता होता.
एक इसम म्हणाला की, तु हमारे खिलाफ मुख्यमंत्री के पास बहुत कंम्पलेट करता है, असे म्हणून त्याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.