लातूर: गेल्या चार महिन्यांपासून राज्यभरातील सर्व डॉक्टर्स, नर्स मोठ्या प्रमाणात कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. मात्र याच दरम्यान डॉक्टरांवर अनेक ठिकाणी हल्ले करण्याची घटना वारंवार समोर येत आहे. याचदरम्यान आता पगाराच्या वादातून कंपाऊंडरने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Video: महाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखलं
लातूरमधील गायत्री सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कंपाऊंडरने डॉक्टरवर हल्ला करण्याची घटना बुधवारी घडली आहे. 20 दिवसांच्या पगारावरून कंपाऊंडरने डॉक्टरांवर दगडाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून त्यात डॉक्टरांचा मदतनीस डॉक्टरांवर दगडाने वारंवार हल्ला करत असल्याचे दिसून आले. कंपाऊंडरच्या हल्ल्यामध्ये डॉक्टरांच्या डोक्याला दुखापत झाली असून हातही मोडला आहे. हल्ल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
आयटीआय प्रवेश अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; नवाब मलिक यांची माहिती
दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४५५ स्वॅबपैकी ३० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर १३० जणांचा अहवाल प्रलंबित आहे. दरम्यान, आतापर्यंत १ हजार २५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील ६७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ५२१ रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ६६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये लातूर २१, निलंगा १, चाकूर २, उदगीर ६ अशा एकूण ३० जणांचा समावेश आहे. लातूर शहरात केशव नगर, जीएससी रोड लातूर, नांदेड रोड, प्रकाश नगर, क्वाईल नगर, साळे गल्ली, वैभव नगर, हाके नगर, सरस्वती कॉलनी, काळे गल्ली, गांधी नगर, यशवंत सोसायटी, विजय नगर, अंबाजोगाई रोड आदी भागांत रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, ३५ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ८, १२ नं. कोविड सेंटर १३, औसा येथील मुलींची शाळा ५, दापका येथील कोविड सेंटर १, उपजिल्हा रुग्णालय निलंगा १, तोंडार पाटी कोविड सेंटर येथील २, चाकूर येथील कृषी पीजी कॉलेज येथील २, शासकीय वसतिगृह न्यू बिल्डींग देवणी येथील ३ अशा एकूण ३५ जणांचा समावेश आहे.