ठाणे - भिवंडी महानगर पालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते व नगरसेवक मतलूब अफजल सरदार यांना ४ लाखांच्या खंडणीप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ माजली आहे. तसेच पालिकेत देकील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शांतीनगरमधल्या पिरानी पाडा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. त्यांनी पिरानी पाडा येथील नुरी अपार्टमेंट या अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफिज अन्सारी यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या मागणीनंतर सलीमने ४ लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी दोन टप्प्यात स्वीकारले होते. परंतु उरलेल्या पैशांसाठी मतलूब यांनी सलीम यांच्याकडे तगादा लावला होता. शेवटी नेहमीच्या वादाला कंटाळलेल्या बिल्डरने शांती नगर पोलीस ठाण्यात खंडणीप्रकरणी नगरसेवकांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच पुरावा म्हणून मोबाईलवर झालेल्या संभाषणाचा पुरावा देखील पोलिसांना बिल्डर दिला. त्यानंतर पोलिसांनी खंडणीखोर नगरसेवकाला जेरबंद केले आहे.
काँग्रेस नगरसेवक चार लाखांच्या खंडणीप्रकरणी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:01 PM
संपूर्ण भिवंडी शहरात खळबळ माजली आहे.
ठळक मुद्देशांतीनगरमधल्या पिरानी पाडा मतदार संघात गेल्या 20 वर्षांपासून मतलूब अफजल सरदार हे नगरसेवक आहेत. अनधिकृत इमारतीस अधिकृत करण्यासाठी बिल्डर सलीम अब्दुल हफिज अन्सारी यांच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. काही पैसे नगरसेवक मतलूब यांनी दोन टप्प्यात स्वीकारले होते.