शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

काँग्रेस नेत्यावर खंडणीचा गुन्हा; नगरसेवकाकडे मागितले होते 50 लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 5:46 PM

कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव

ठळक मुद्दे या फरार नेत्याला पोलीस कधी पकडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवक अरुण जाधव यांनी बांधलेल्या इमारतीच्या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात 2016 साली गुन्हा दाखल झाला होता.50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या काँग्रेस नेत्यावर वसई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमानव्ये खंडणीचा गुन्हा दाखल

नालासोपारा - नगरसेवकाने अनधिकृत बांधलेल्या इमारतीची माहिती अधिकारात मागवून अपिलात जाणार किंवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू अशी धमकी देऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या काँग्रेस नेत्यावर वसई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमानव्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पण पुन्हा एकदा वसई तालुक्यात माहितीच्या अधिकाराचा दुरुउपयोग करून बांधकाम व्यवसायिकांकडून कसे उकळले जातात हे पुन्हा एकदा उघड झाले असून राजकीय पक्षाचे नेतेमंडळीमध्ये खळबळ माजली आहे. कुमार काकडे असे खंडणी दाखल झालेल्या काँग्रेस नेत्याचे नाव असून या फरार नेत्याला पोलीस कधी पकडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवक अरुण जाधव यांनी बांधलेल्या इमारतीच्या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात 2016 साली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात जामिनावर खुला झाल्यानंतर कुमार काकडे याने अपिलात जाऊन दुसऱ्या बांधकामाची कागदपत्रे मिळाली असून ती दाखवून 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने अब्रू जाईल या भीतीने नावाची खराबी होऊ नये म्हणून कुमार नाईक यांच्या मध्यस्थीने सप्टेंबर 2016 साली शेवटच्या आठवड्यात भुईगाव येथील जाप आळीमधील स्वामी गुरुदत्तच्या आश्रमातील मठात 10 लाख रुपये रोख स्वीकारले. त्यानंतर 27 ऑक्टोबर 2016 साली संध्याकाळी साडे सातच्या सुमारास सदर मठात अरुण जाधव कडून काकडे याने 20 लाख रुपये घेतले होते. उर्वरित 20 लाख रुपये मार्केट मध्ये मंदी असल्या कारणाने दिवाळीनंतर देतो असे सांगण्यात आले होते. पण कुमार काकडे हा पूर्ण पैश्यांचा व्यवहार झाल्यानंतर पलटू नये व परत दुसऱ्या कोणत्या कारणावरून दम देऊ नये याकरिता 27 ऑक्टोबरला मठात कुमार काकडेला पैसे देत असताना व्हिडीओ आणि व्हाईस रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. उर्वरित 20 लाख रुपये अरुण जाधव काकडेला देऊ न शकल्याने वारंवार न्यायालायत अपिलमध्ये जाण्याची व पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता. 2016 साली वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बविआच्या पक्षातर्फे अरुण जाधव यांनी नगरसेवकासाठी उमेदवार उभे राहिल्यावर कुमार काकडे यानेही उमेदवारी अर्ज भरून उभा राहिला होता पण या निवडणुकीत कुमार काकडे याचा पराभव झाला होता. हाच राग मनात असल्याने काकडे यांनी अरुण यांच्या वडिलांच्या कार्यकाळात बांधलेल्या इमारतीची माहिती माहिती अधिकारात मिळवून महानगरपालिकेत, पोलीस ठाण्यात आणि न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला असल्याचेही कळते.  

कुमार काकडे याने 30 लाख रुपयांची खंडणी घेतल्याचे ऑडिओ आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग असल्याने वसई पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार दिली आहे. कुमार काकडे याने इतका पैसा, जमिनी, गाड्या कुठून कमवले ? किती बिल्डरांकडून माहिती मागवून लाखो रुपये घेतले याची चौकशी करणे खूप गरजेचे आहे. या प्रकरणाची खोलवर तपासणी केली तर अनेक प्रकरणे उघड होतील. - शेखर जाधव (तक्रारदार)

टॅग्स :Extortionखंडणीcongressकाँग्रेसMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिस