काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:29 PM2021-04-21T21:29:48+5:302021-04-21T21:30:58+5:30

Congress leader's son threatened : या दरम्यान पोलिस पथकावर पुष्पेंद्रच्या कुटुंबियांनी हल्ला केला.

Congress leader's son threatened with death; 3 crore has been seized | काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप

काँग्रेस नेत्याच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी; ३ कोटी रूपये केले हडप

Next
ठळक मुद्देआपला मुलगा मनोजला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ कोटी रुपये हडपल्याबद्दल चितळवानाचे माजी उपप्रमुख लक्ष्मीचंद गांधी यांनी शांतीलाल, पुष्पेंद्रसिंग, भरतसिंग, किशन यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जलोरः जलोर जिल्ह्यातील चितळवाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत काँग्रेस नेते लक्ष्मीचंद गांधी यांचा मुलगा मनोजला जीवे मारण्याची धमकी देऊन तीन कोटी रुपये वसूल केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आपला मुलगा मनोजला जिवे मारण्याची धमकी देऊन ३ कोटी रुपये हडपल्याबद्दल चितळवानाचे माजी उपप्रमुख लक्ष्मीचंद गांधी यांनी शांतीलाल, पुष्पेंद्रसिंग, भरतसिंग, किशन यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शांतीलाल, किशनलाल आणि भरत कुमार यांना अटक केली आणि त्यांची चौकशी केली. या प्रकरणात या तिन्ही दोषींना अटक करण्यात आली असून तीन स्विफ्ट कार जप्त केल्या आहेत. लक्ष्मीचंद यांचा मुलगा मनोज कुमार यांना धमकावताना त्याने पैसे हडप करण्यासाठी संभाषणासाठी वापरलेला मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे.


आरोपी शांतीलाल पुरोहित यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी २५ लाख रुपये उकलण्याचा हेतूने जीवे मारण्याची भीती दाखवली. दोन तीन दिवसांपूर्वी पीडित मनोजकडे 50 लाखांची मागणी केली आणि आरोपी पुष्पेंद्र यांनी पीडित मनोज कुमारकडून २५ लाख रुपये जीवे मारण्याची भीती दाखवून हडप केले. त्याच वेळी फरार आरोपी पुष्पेंद्रला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या सांचोर सीओच्या नेतृत्वात  झाब  व चितळवाना पोलिसांनी छापा टाकला.

या दरम्यान पोलिस पथकावर पुष्पेंद्रच्या कुटुंबियांनी हल्ला केला. यात  झाब  पोलीस ठाण्याचे पोलीस अनु चौधरी आणि एक महिला हवालदार जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार तीन कोटींच्या खंडणीचे प्रकरण राजस्थानमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे प्रकरण आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी छापा टाकला. आरोपींनी हडप केलेले लाखो रुपये जप्त करण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Congress leader's son threatened with death; 3 crore has been seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.