आशिष सिंह
मुंबई : एनआयएने बोईसर तसेच कर्नाटकातील बंगळुरू येथे छापे मारून दोघा जणांना अटक केली. ते आयसिसच्या एकाच हॅन्डलरशी जोडले होते आणि इराक, अफगाणिस्तानमार्गे सीरियाला जाण्याच्या तयारीत होते.
आयसिसच्या हॅन्डलरसोबत ते इन्क्रिप्टेड संपर्क व्यवस्थेमार्फत संपर्कात होते. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचेही काम ते करीत होते, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे. शनिवारी पहाटे एनआयएने हे छापा सत्र सुरू करून प्रथम बंगळुरूचा सॉफ्टवेअर इंजिनीअर मोहंमद आरिफ याला ताब्यात घेतले. मूळचा अलिगडचा रहिवासी असलेला आरिफ दोन वर्षांपासून बंगळुरूत आयटी कंपनीत काम करीत होता. आयसिसच्या हस्तकांच्या मदतीने त्याने मार्च महिन्यात सीरियाला जाण्याची योजना आखली होती. छाप्यात एनआयएला अन्य माहिती मिळाली.