बलवंत तक्षक - चंडीगड : पाच दहशतवाद्यांना अटक करून पंजाबपोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा कट उधळून लावला. हे पाच जण स्वातंत्र्य दिनापूर्वी काही नेते, पोलिस अधिकाऱ्यांची हत्या करण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी सांगितले की, ज्यांची हत्या करायची त्यांच्या नावांची यादी आरोपींना दिली होती. त्यांनी त्यातील काहींची रेकीही केली होती.
हे पाच जण खलिस्तान लिबरेशन फोर्स या फुटीरवादी संघटनेशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. गगनदीप सिंग, आशिष, सागर मसीह, राजीव मसीह आणि समनदीपसिंग चीमा अशी आरोपींची नावे असून, ते गुरदासपूर येथील रहिवासी आहेत.