मधुकर ठाकूरउरण : न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या कस्टडीतअसलेला न्हावा-शेवा सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) ताब्यात असलेला चार कोटी किंमतीच्या सिगारेटचा साठा असलेले कंटेनर चोरीस गेला आहे. उरण-सोनारी येथील जेएनपीटीच्या स्पीडी सीएसएफमध्ये हा कंटेनर ठेवण्यात आला होता.v
जेएनपीटी बंदर सध्या आंतरराष्ट्रीय माफियांचा अड्डा बनला आहे.सोने,रक्तचंदन,अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना नित्याच्याच झालेल्या आहेत. डीआरए ,सीमा शुल्क विभागाच्या विविध विभागाकडून विविध प्रकारच्या तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर जप्त केले जातात.उरण परिसरातील कोणत्याही कंटेनर यार्डमध्ये तस्करीत वापरण्यात आलेले कंटेनर येथील जेएनपीटीच्या सीएफएमध्ये आणले जातात.काही कंपन्या कंटेनरमधुन बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन तस्करीच्या मालाची आयात-निर्यात करतात.अशा चोरट्या मालाची आयात-निर्यात करताना तस्करीत सहभागी असलेल्या कंपन्या आपले बिंग फुटले जाऊ नये यासाठी बनावट कंपन्यांंच्या नावाचाही वापर करतात.तस्करीचा माल पकडला तर अशा बनावट कंपन्या माल ताब्यात घेण्यासाठी पुढे येत नाहीत.मग अशा आयात-निर्यातीच्या बेनामी तस्करी प्रकरणात जप्त करण्यात आलेले कंटेनर बेवारस म्हणुन घोषित केले जातात. आयात-निर्यातीच्या प्रकरणात डीआरआय विभागाने जप्त करण्यात आलेले शेकडो कंटेनर येथील जेएनपीटीच्या स्पीडी सीएफएस ठेवण्यात येतात.असे शेकडो संशयित कंटेनर अनेक वर्षांपासून जेएनपीटीच्या स्पीडी कंटेनर यार्डमध्ये धुळखात पडून आहेत.
न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाने ५ फेब्रुवारी २०१९ रोजी २३ लाख ३२ हजार ८०० सिगारेटचा स्टीक असलेला सिगारेटचा साठा जप्त केला होता.या सिगारेटच्या साठ्याची किंमत चार कोटींच्या घरात आहे. खरं तर जप्त करण्यात आलेला सिगारेटचा साठ्याची विल्हेवाट लावण्याची तयारी सीमा शुल्क विभागाच्या डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली होती.मात्र कोट्यावधींच्या सिगारेटच्या साठ्याची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू असतानाच ८ डिसेंबर रोजी सिगारेटचा साठा कंटेनरमधुन चोरीला गेला आहे.यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी न्हावा- शेवा सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील एका संशयित एजंटला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी दिली.
सविस्तर माहिती थोड्याच वेळात