लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने अॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त आरोपी साहिल कुरेशी ऊर्फ खुर्शिद सय्यद (३८) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये हेमवती तिवारी, नीलिमा जयस्वाल आदींचा समावेश आहे. मानकापूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४९, १८८, २६९, २७०, २७१, ४४८ व ५०६ (२)अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांच्यावरही गंभीर आरोप आहेत. हॉस्पिटलमागे असलेल्या जमिनीसंदर्भात आरोपी साहिल व हॉस्पिटल व्यवस्थापनामध्ये वाद सुरू आहे. त्यातून आरोपींनी हॉस्पिटलविरुद्ध कट रचला. त्यानुसार जून-२०२० मध्ये हेमवती तिवारी सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेली व सोनोग्राफीसंदर्भात महानगरपालिकेकडे तक्रार दिली. त्यानंतर डॉ. गंटावार यांनी हॉस्पिटलमध्ये धाड टाकून सोनोग्राफी मशीन्स सील केल्या. तसेच, ४ जुलै २०२० रोजी साहिलने हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना ठार मारण्याची व हॉस्पिटलची संरक्षण भिंत बुलडोझरने तोडण्याची धमकी दिली. तसेच, साहिलची एक ऑडिओ क्लीप नुकतीच व्हायरल झाली. त्यात अनेक वादग्रस्त वक्तव्ये करण्यात आली आहेत. महापौर संदीप जोशी व नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना फसविण्याचा उल्लेख त्यात आहे. परिणामी, विविध प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी साहिलला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करणे आवश्यक आहे असे जिल्हा सरकारी वकील अॅड. नितीन तेलगोटे यांनी न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने साहिलला दणका दिला.
वादग्रस्त साहिल सय्यदला अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 12:00 AM
सत्र न्यायालयाने अॅलेक्सिस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध कट रचण्याच्या प्रकरणातील वादग्रस्त आरोपी साहिल कुरेशी ऊर्फ खुर्शिद सय्यद (३८) याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला.
ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा दणका : अॅलेक्सिस हॉस्पिटलविरुद्धच्या कटाचे प्रकरण