अहमदनगर - मकरसंक्रांती सणानिमित्त घराच्या छतावर पतंग उडविताना हनुमान चालीसा हे धार्मिक गीत का लावले, असे म्हणत घरात घुसून स्पीकरचे केबील वायर फेकून दिल्याप्रकरणी तिघांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी भिंगार परिसरातील आलमगीर येथे घडली. तुम्ही हनुमान चाळीस लावू नका असे म्हणत तिघांनी शिवीगाळी आणि दमदाटी केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. शोएब व सोहेल (जुडवा). आणखी एकजण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभावती दशरथ मुंडे (रा. द्वारकाधीश कॉलनी, आलमगीर रोड, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची दोन मुले घराच्या छतावर पतंग उडवित होते. पतंग उडविताना त्यांनी हनुमान चालीसा हे धार्मिक गीत लावले होते. दरम्यान, सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शोएब व सोहेल यांच्यासह आणखी एक अनोळखी मुलगा असे तिघे घरात घुसले. घरातील जिन्याच्या पायऱ्या चढून छतावर जात होते. त्यांच्याकडे विचारणा केली असता ते धक्का देऊन जिन्याने छतावर गेले. तेथील स्पीकरची केवल तोडून त्यांनी फेकून दिली. मुलगा वसंत दशरथ मुंडे यास पुन्हा स्पीकर लावू नको, असे म्हणत शिवीगाळ करून निघून गेले. या घटनेमुळे आलमगीर परिसरात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.
'हनुमान चालीसा' लावण्यावरुन वादंग, दोघांना पोलिसांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 5:09 PM