नवी दिल्ली - देशात कोरोनाचा काही ठिकाणी कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. मास्क न लावल्यास दंड वसूल केला जात आहे. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातमधील सुरतमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. मास्क लावला नाही म्हणून पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतलं होतं. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे.
मास्क घातलं नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केला आहे. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा असं देखील म्हटलं आहे. महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केला आहे. नरेश कपाडिया असं असं आरोप करण्यात आलेल्या पोलिसांचं नाव आहे. त्यामुळेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान पलसाना येथे राहणारी पीडित महिला दूध आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यावेळीच या पोलीस हवालदाराने मास्क न घातल्याचं कारण देत या महिलेला अडवलं आणि कारवाई करण्याची धमकी देत तिला ताब्यात घेतलं. या महिलेला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तो तिला नवसारी रोड येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथे बेशुद्ध केलं. त्यानंतर मारहाण केली आणि बलात्कार देखील केला असा आरोप महिलेने केल आहे. तसेच त्याच्याकडे माझे काही फोटो आणि व्हिडीओ आहेत. पोलिसाने नंतर या फोटोंचा वापर करुन महिलेला छळण्यास सुरुवात केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! आई ओरडली म्हणून 'तिने' घर सोडलं पण नराधमांनी गाठलं; अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
आई ओरडली म्हणून एका अल्पवयीन मुलीने घर सोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीला वाटेत काही नराधमांनी गाठलं आणि तिच्यावर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींना अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास देखील करत आहेत. लखनऊच्या ग्रामीण भागातील इटौंजा भागात संबंधित घटना घडली आहे. आई ओरडली म्हणून 14 वर्षीय मुलगी नाराज होऊन घराबाहेर पडली. तिने घरी परत येणार नाही, अशी आई-वडिलांना धमकी दिली. ती घरातून बाहेर पडल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या वडिलांनी इटौंजा पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार केली होती.