अंबरनाथ - अंबरनाथ पोलीस स्टेशन हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधी अंबरनाथ पोलीस कोठडीतील चार आरोपींना कोणाची लागण झाल्याचे समोर आलेले असतानाच शुक्रवारी पुन्हा एका आरोपीला करण्याची लागण झाली आहे. त्यामुळे अंबरनाथ पोलीस कोठडी हे कैद्यांसाठी कोरण्याचा हॉटस्पॉट झाल्याचे समोर येत आहे.
अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सात आरोपींपैकी चार आरोपींना 14 मे रोजी कोणाची लागण झाल्याचे समोर आले होते. या प्रकारानंतर चारही आरोपींवर बदलापूरच्या कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच अवघा आठवड्याभरातच आणखीन एका आरोपीला कॉरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी समोर आले आहे. हा आरोपी गेल्या सात दिवसांपासून अंबरनाथ पोलिस ठाण्यातील पोलिस कोठडीत होता त्यामुळे या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. आरोपी कोरोना बाधीत होत असल्याने पोलिसांच्या चिंतेत प्रचंड प्रमानात वाढ झाली आहे.
Coronavirus : पोलीस दलाला कोरोनाचा वाढता विळखा, ठाण्यात महिला पोलिसाचा मृत्यू
विकृत! ५१ वर्षीय व्यक्तीने मृतदेहाशी सेक्स करण्याचा केला प्रयत्न
धक्कादायक! मुलाला 'क्राईम सिरीअल' दाखवत तयार केले; मातेने तिहेरी हत्याकांड घडवलं