नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांनी धर्म विचारून भाजी विक्रेत्यास मारहाण केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रवीण बब्बर असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी व्हिडिओमध्ये एक भाजी विक्रेता त्याचा धर्म विचारत होता आणि काठीने मारहाण करताना दिसला. आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीच्या डीसीपी आरपी मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसा, ट्विटरवरील अनेक नामांकित लोकांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये एक माणूस भाजी विक्रेत्याला धर्म विचारून मारहाण करीत आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा सायबर सेलने व्हिडिओची तपासणी सुरू केली तेव्हा व्हिडिओमध्ये एक बाईक उभी असल्याचे दिसले, ज्याचा नंबर डीएल 9 एस बीएक्स 9250 (DL 9S BX9250) होता, दुचाकी मोलरबंद भागातील सुधांशु नावाच्या व्यक्तीची असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सुधांशुला विचारले असता त्यांनी सांगितले की, ही घटना ताजपूर रोडची आहे. भाजी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रवीण बब्बर आहे आणि तो बदरपूर एक्स्टेंशन येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.
पोलिसांनी प्रवीण बब्बरला अटक केली आहे. प्रवीण म्हणाला की तो टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करतो. लॉकडाऊनदरम्यान10 भाजीपाला दुकानदार रस्त्यावर फेरीवाल्याप्रमाणे फिरत आहेत असं त्याला आढळून आहे. त्यामुळे त्याने संतापून त्याला मारहाण केली. पोलिसही पीडित भाजीवाल्याला भेटले. पीडित भाजीवाल्याचे म्हणणे आहे की, आरोपीने त्याचा धर्म विचारला आणि त्याला मारहाण करून अत्याचार केला आणि सांगितले की तुम्हीच कोरोना पसरवित आहात.