ठळक मुद्देआता या मदतीच्या नावावर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. नगरसेविका मोनाली तरे आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्यासह ३० कार्यकर्त्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल
कल्याण - लॉकडाउनच्या काळात गरजू नागरिकांच्या मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आता या मदतीच्या नावावर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. कल्याण पूर्व येथील खडेगोळवली परिसरात जेवण वाटण्यावरून आजी - माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात आपापसात खडाजंगी झाली.
तुरुंगात जाण्याच्या भीतीने पोलिसाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
200 रुपये दिले नाही म्हणून डोक्यात हातोडा हाणून केली हत्या
या वादात भाजपा नगरसेवक विक्रम तरे, नगरसेविका मोनाली तरे आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्यासह ३० कार्यकर्त्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात दोन्ही गटातील ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.