चुरू – कोरोना चाचणी करण्याच्या बहाण्याने ३६ वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रतनगड परिसरात झालेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. या महिलेवर राजकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हावडा येथे राहणारी महिला तिच्या सासरी डीडवाना येथे चालत निघाली होती. त्यावेळी रस्त्यातून जाणाऱ्या एका ट्रक्टरने तिला रतनगडपर्यंत पोहचवले, हावडा जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नव्हतं. तेव्हा स्टेशन रोड परिसरात तिथे काही साधूंनी तिला जेवणं दिलं. या दरम्यान आलेल्या मुस्ताक आणि त्रिलोकने महिलेला रुग्णालयाशेजारील एका दूध डेअरीजवळ तिला झोपण्यास जागा दिली.
२० मे रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी हे दोघं पुन्हा महिलेजवळ आले आणि कोरोना चाचणी करावी लागेल असं सांगितले. संधी मिळताच हे दोघं महिलेला घेऊन हॉस्पिटलच्या टॉयलेटच्या मागच्या बाजूस गेले आणि तिथे या महिलेवर बलात्कार करण्यात आला. घटनेनंतर हॉस्पिटलमध्ये बनवण्यात आलेल्या सुलभ कॉम्पलेक्समध्ये महिलेला स्नान करण्यासाठी घेऊन गेले. त्याठिकाणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेही तिच्यासोबत अश्लिल चाळे केले.
या घटनेनंतर विजय नायक नावाच्या या व्यक्तीने महिलेला पोलीस ठाण्यात घेऊन गेला. त्याठिकाणी सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींची ओळख पटवण्यात आली असल्याचं पोलिसांनी सांगितले. डीएसपी प्यारेलाल मीणा यांनी सांगितले, महिला पश्चिम बंगालमध्ये राहणारी आहे. तिचे सासर डीडवाना येथे आहे. पश्चिम बंगालला जाण्यासाठी ती पायपीट करत रतनगड येथे पोहचली होती. रेल्वे स्टेशन परिसरात आरोपींनी या महिलेला कोरोना स्क्रिनिंग करण्याचं सांगितले. स्क्रिनिंग करण्याच्या बहाण्याने टॉयलेटच्या मागे असणाऱ्या झाडांमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या महिलेच्या म्हणण्यानुसार दोघांनी तिच्यावर बलात्कार केला तर एकाने अश्लिल चाळे केले. पोलिसांनी या महिलेला मेडिकलसाठी पाठवलं आहे. त्यानंतर आलेल्या अहवालावरुन स्पष्ट होईल, त्याचसोबत तपास सुरु राहील असं पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सुमारे ३ कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर लीक
कोरोना लसीच्या चाचणीत भारताला मोठी आशा; लहान मुलं अन् वृद्धांवर होणार प्रयोग!
भारताविरुद्ध चीन आणि पाकिस्तानचं मोठं षडयंत्र?; कारगिल युद्धावेळीही ‘असचं’ घडलं होतं!
कोरोनाचा एकही रुग्ण न सापडलेल्या या राज्यात १५ जूनपासून सुरू होणार शाळा-कॉलेज
विहिरीतून काढले तब्बल ९ मृतदेह; एकाच कुटुंबातील ६ जणांचा समावेश, परिसरात खळबळ