शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

धक्कादायक! लॉकडाऊनदरम्यान घरी परतणाऱ्या विद्यार्थिनीवर 10 जणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 3:24 PM

एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. 

ठळक मुद्देनागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांत लॉकडाऊन करण्यात आल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे. त्याचा फायदा काही नराधमांनी घेतला आहे. एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

रांचीः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्वच सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही सरकारकडून देण्यात आल्या आहेत. अनेक राज्यांत लॉकडाऊन करण्यात आल्यानं रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला आहे. त्याचा फायदा काही नराधमांनी घेतला आहे. एका १६ वर्षांच्या विद्यार्थिनीवर १० तरुणांनी आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. झारखंडमधल्या दुमका शहरातील शिवपहार येथे भाड्याच्या घरात ही पीडिता राहत असून, एसपी महाविद्यालयात शिकते. लॉकडाऊन झाल्याने महाविद्यालय बंद करण्यात आलं होतं. रस्त्यांवर वाहनांनी वर्दळही बंद होती. 24 मार्चला ती एका मैत्रिणीसह घरी परतत असताना गावच्या वेशीवर सोडून मैत्रीण निघून गेली. सोबतीसाठी तिने आपल्या घरातील सदस्यांना त्या ठिकाणी बोलावले होते. संध्याकाळपर्यंत कुटुंब न आल्यानं तरुणीनं गावातील मित्र विक्की उर्फ ​​प्रसन्नजित हंसदा याला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले.  हा तरुण त्याचा गावातील रहिवासी असल्यानं लागलीच मित्रासोबत दुचाकीसह तरुणी उभी असलेल्या वळणावर पोहोचला.विकीने घरी जाण्याऐवजी दुसऱ्या वाटेवरून दुचाकी घेतली. जेव्हा पीडितेनं विकीला हा घरी जाण्याचा मार्ग नाही ,असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला की, रस्त्यावर तपासणी सुरू आहे म्हणून आम्ही कच्च्या रस्त्यावरून घरी जात आहोत. काही अंतर गेल्यानंतर विकीने निर्जन जंगलाजवळ दुचाकी थांबविली आणि शौचालयाला जातो, असं सांगितलं. पीडिता विकीच्या अज्ञात मित्रासह बराच काळ निर्जन जंगलात उभी होती. त्यानंतर विक्कीने मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आठ तरुण तोंडाला कपडा बांधून आले आणि तिला जिवे मारण्याची धमकी देत ​​गळ्यावर चाकू धरला.त्या आठ जणांनी तरुणीवर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर रात्रभर जंगलात बेशुद्धावस्थेत सोडून ते नराधम तिथून पसार झाले. दुसर्‍या दिवशी 25 मार्चला सकाळी ती जंगलातून कशीबशी रस्त्यावर आली, तेव्हा गावकऱ्यांनी तिला पाहिले आणि कुटुंबीयांना माहिती दिली. प्रसंगी आई, वडील आणि भाऊ आले आणि तिला उचलून घरी घेऊन गेले. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेवर नजीकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMolestationविनयभंग