कोल्हापूर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होउ नये म्हणून कोल्हापूर शहरात बंदोबस्तावर असणाऱ्या होमगार्डला अॅट्रासिटीची धमकी देणाऱ्या सदर बाजार येथील शेखर सनदी या व्यक्तीवर सरकारी कामात अडथळा करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात काटोकोरपणे सुरु आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने विविध मार्गावर कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांना मदत म्हणून होमगार्डच्या जवानांचीही मदत घेतली जाते.दि.२७ मार्च रोजी रात्री ८.३0 वाजण्याच्या सुमारास होमगार्ड जवान शैलेश माळी हे सदर बाजार येथील मस्जिद चौकाजवळ बंदोबस्तासाठी तैनात होते. त्यावेळी सदर बाजार येथील शेखर सनदी याने तोंडाला मास्क न घालता माळी यांच्याजवळ येत दमदाटी केली.होमगार्डला ड्यूटी लागलेली नाही, लोकांना घरी बसा म्हणून सांगण्याचा तुम्हाला काय अधिकार अशा शब्दात त्याने दमदाटी केली. तसेच तुम्ही लोकांना दमदाटी करु नका, अशी उध्दट भाषा वापरत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.शेखर सनदी याने एका पेपरचा आपण संपादक असून सदर बाजार येथे राहत असल्याचे माळी यांना सांगितले. मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो आहे, हे सांगत आपल्याजवळील मोबाईल कॅमेऱ्यावरुन शूटींग केल्यासारखे केले.तुम्ही कशी ड्यूटी करता हे एस.पी आणि डीवायएसपी यांना पाठवतो, असे म्हणत अरेतुरेच्या भाषेत धमकी दिली आणि येथून निघून जाण्यास सांगितले. सनदी याने जवान माळी यांना धक्का देत तुमच्यावर अॅट्रासिटीची तक्रार करण्याचीही धमकी दिली.जवान माळी यांनी याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात सनदी याच्याविरोधात तक्रार दाखल केली असून भा. दं. वि. कलम ३५३, ३२३, ५0६ तसेच महाराष्ट्र COVID 19 उपाय योजना २0२0 चे कलम ११ नुसार सनदी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CoronaVirus Lockdown : संचारबंदीदरम्यान अॅट्रासिटी दाखल करण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 3:05 PM
CoronaVirus Lockdown : याप्रकरणी होमगार्ड शैलेश माळी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
ठळक मुद्दे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या संचारबंदीची अंमलबजावणी कोल्हापूर शहरात काटोकोरपणे सुरु आहे. शेखर सनदी याने एका पेपरचा आपण संपादक असून सदर बाजार येथे राहत असल्याचे माळी यांना सांगितले.