नोएडा - कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असताना काही लोक असे आहेत ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून गरज नसताना घराबाहेर पडले आहेत. मात्र,लॉकडाऊन दरम्यान, काही लोकं घराबाहेर पाडण्यासाठी आणि पोलिसांचा मार खाण्यापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहेत. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये अशीच एक मजेशीर घटना समोर आली आहे.उत्तर प्रदेश सरकारने गाझियाबादमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गाझियाबादच्या विजय नगर भागात, एक तरुण घराबाहेर पडला आणि रस्त्यावर फिरण्यासाठी बोगस दूधवाला बनला होता. सर्वांनी हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लॉकडाऊनदरम्यान फक्त आवश्यक सेवा आणि उत्पादनांच्या पुरवठा करणाऱ्यांना रस्त्यावर परवानगी आहे.
हा तरुण दुध पात्र घेऊन दुचाकीवरून फिरत होता. तपासादरम्यान पोलिसांनी अडवून या तरुणाची चौकशी केली असता दुधाचे पात्र (डबा) रिकामा सापडला. पोलिसांना तपासणीत दूध कंटेनरच्या आत गंज असल्याचे आढळले. पोलिसांकडून या युवकाची काटेकोरपणे चौकशी केली असता त्याने सांगितले की तो फेक दूधवाला बनला होता आणि पोलिसांना टाळण्यासाठी रिकामे दूध कंटेनर घेऊन फिरत होता.पोलिसांनी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याची मोटरसायकल जप्त केला आहे. लॉकडाऊन काटेकोरपणे पाळा अन्यथा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.