मुंबई : समाजात कायदा व सुव्यस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना नागरिकांना आता शिस्त व स्वतःच्या सुरक्षेचे धडे द्यावे लागत आहेत. कोरोनामुळे भयभीत झालेल्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, यासाठी पायधुनी पोलिसांचे पथक हद्दीत विशेष मोहीम राबवित आहे.
सर्वसामान्य जनतेला किराणा माल किराणा दुकानातून उपलब्ध व्हावा तसेच गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता, तसेच कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थे प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता उपनिरीक्षक सुनील रणदिवे आणि त्याच्या सहकार्यांनी भागातील दुकानाच्या परिसरात विशिष्ट अंतर ठेवून रांगा लावून खरेदी करण्यासाठी जागा आखून देणे, सुरक्षिततेबाबत काळजी घेणे बद्दल मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे नेहमी नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या पायधुनी परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील रणदिवे यांनी सहकार्याच्या मदतीने हा उपक्रम राबविला .