शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

जन्मदात्रीला मुखाग्नीही देता आला नाही; एकुलत्या एका मुलाला पोलिसांची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 10:36 PM

CoronaVirus Lockdown : दूरवर राहणाऱ्या लोकांवर त्यांचे मृत आई - वडील आणि जवळच्या नातलगांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर पडताना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

ठळक मुद्देठाण्यात फर्निचरचं काम करणाऱ्या भैरोंलाल लोहारची आई रुक्मिणीबाई यांचे राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात निधन झाले. या बातमीने भैरोंलाल लोहार यांना धक्का बसला. भैरोंलाल यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गावातून आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले. या प्रिंटआउटच्या आधारे स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली.

ठाणे - कोरोना विषाणूमुळे देशात संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. परंतु यावेळी पोलिसांची एक चांगली तर दुसरी अमानुष बाजू दिसून येत आहेत. अशा अनेक घटना समोर येत आहेत. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, ज्यात दूरवर राहणाऱ्या लोकांवर त्यांचे मृत आई - वडील आणि जवळच्या नातलगांच्या अंत्यसंस्कार करण्यासाठी बाहेर पडताना पोलिसांच्या कठोर कारवाईला सामोरं जावं लागत आहे.ठाण्यात फर्निचरचं काम करणाऱ्या भैरोंलाल लोहारची आई रुक्मिणीबाई यांचे राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात निधन झाले. या बातमीने भैरोंलाल लोहार यांना धक्का बसला. आईचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे भैरोंलाल यांना त्यांच्या अंत्यसंस्कारात जाणे आवश्यक होते. त्याच्या हातून अंत्यसंस्कार केले जाणार होते. मात्र, कर्फ्यूदरम्यान घराबाहेर कसे पडायचे ही समस्या होती.त्यांनी आपला मित्र आणि शिवसेनेचे स्थानिक उपशाखा प्रमुख राजू शिरोडकर यांची मदत घेतली. शिरोडकर यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. ज्यामध्ये भैरोंलाल व त्याचे कुटुंब राजस्थानला जाऊ शकले. भैरोंलाल यांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून गावातून आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मागितले. या प्रिंटआउटच्या आधारे स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेण्यात आली.प्रवासादरम्यान त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कोणतीही अडचण आली नाही.परंतु गुजरातच्या सीमेवर पोहोचताच गुजरात पोलिसांनी त्याला रोखले. पोलीस त्याचे म्हणणे ऐकण्यास तयार नव्हते. त्याने मोठ्याने त्याच्यावर आरडाओरडा केला. पण त्याला आणखी पुढे जाऊ दिले नाही. जेव्हा त्याने मोबाइलवर व्हिडिओ कॉलद्वारे पुरावा म्हणून त्याच्या मृत आईचा मृतदेह दर्शविणे सुरू केले, त्यावेळी पोलिसांचा पारा चढला. त्याने मोबाइल उचलला आणि फेकून दिला. मृत्यूचे प्रमाणपत्र फाटले.भैरों लाल, त्याचा भाऊ आणि रुग्णवाहिका चालक यांना लाठ्यांनी इतके मारहाण केली की तीन दिवसांनंतरही त्यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. रुग्णवाहिकेत बसलेल्या भैरोंलाल यांच्या पत्नीने खूप विनवणी केली. परंतु पोलिसांनी त्यांचेही काही ऐकले नाही. आईला मुखाग्नी देऊ न शकल्याने भैरोंलाल दु: खी राहिले. त्याच्या बाकीच्या नातेवाईकांना आईचा अंत्यसंस्कार करावा लागला.

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेRajasthanराजस्थानcorona virusकोरोना वायरस बातम्या