शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

Coronavirus: धक्कादायक! आयसोलेशनमध्ये गर्भवती महिलेवर आरोग्य कर्मचाऱ्याने केला दोन दिवस बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 2:07 PM

माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती.

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २९० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने सलग दोन दिवस महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात महिलेच्या सासूने रोशनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत होती. यासाठी 25 मार्च रोजी ही महिला लुधियानाहून आपल्या पतीसमवेत रुग्णालयात आली होती. परंतु महिलेची कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर महिलेला जास्त रक्तस्त्राव सुरु झाला आणि तिचा  दुसर्‍याच दिवशी मृत्यू झाला असल्याचे महिलेच्या सासूने सांगितले. 

माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती. परंतु रुग्णालयातील गेटमॅनने तिला इज्जतीची भीती दाखवली. ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही असा दावा महिलेच्या सासूने केला आहे. माझी सून व तिच्या जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूला आरोग्य कर्मचारी जबाबदार असल्याचे सासूने सांगितले.

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या अत्याचारात झाली वाढ

लॉकडाऊनमध्ये केवळ महिलाच नाहीत तर मुलेही घरातच बंद आहेत. ही त्याची मोठी समस्या बनली आहे कारण त्याला अजूनही छळ करणाऱ्यांसोबत 24 तास घालवावे लागत आहे. हेच कारण आहे की 20 ते 31 मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन 1098' ला देशभरातून 3 लाख 7 हजार कॉल आले. चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हर्लीन वालिया म्हणाले की, 92,105 कॉलपैकी 30 टक्के कॉल मुलांना त्रास व हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केले गेले. 24 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ झाली आहे. वालिया यांच्या मते, लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये 50% वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचारही वाढले

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 24 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात महिलांवरील अत्याचार केल्याच्या 1,257 तक्रारी आल्या. अशी भीती अशी आहे की, अशा बऱ्याच घडल्या असतील, परंतु छळ केल्यानंतर  चोवीस तास घरीच असल्याने भीतीपोटी महिला तक्रार नोंदवू शकणार नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRapeबलात्कारBiharबिहारIndiaभारतDeathमृत्यू