मुंबई - मुंबईतील एका परिमंडळातील पोलीस उपायुक्त संभाव्य कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. संभाव्य कोरोनाबाधित पोलीस उपायुक्त यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची कोरोनाची चाचणी झाली असून अहवाल प्रलंबित असल्याची डॉ. जलील परकार यांनी माहिती दिली आहे. उपायुक्तांचे कार्यालय क्वारंटाईन करण्यात आले आहे.
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हे कोरोनाची लागण झाली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १५ मार्च पासून ते २७ मार्चपर्यंत त्याच्या संपर्कात आलेल्या २५ पोलिसांची देखील तपासणी केली जाणार आहे.
३० मार्च रोजी पोलीस हवालदार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या सोबत १५ मार्च ते २२ मार्च आणि २४ मार्च ते २७ मार्च सीएसएमटी रेल्वे स्थानक आणि लॉकअप गार्ड येथे संपर्कात आलेल्या २५ पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आले होते.