मुंबई - देशभरात कोरोनाने थैमान घातले असून निजामुद्दिनस्थित मरकज येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमास सामील झालेल्यांपैकी काही कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मरकजहून आलेल्या तबलिगींना स्वतःहून माहिती देण्यास सांगितले होते. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली होती. त्यानुसार आज १० तबलिगींना मुंबईपोलिसांनीअटक केली आहे.
अटक केलेले तबलिगी जमातचे हे सदस्य इंडोनेशियाचे आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर अटक केली आहे. त्यांच्यावर भा. दं. वि. च्या विविध कलमे लावून त्यांना अटक करण्यात आली आहेत. तबलिगी जमातच्या दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशभरात पसरलेल्या तबलिगींमुळे कोरोगाचा थोडाफार संसर्ग वाढला. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आहे.
नवी दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातचा जो कार्यक्रम झाला त्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली. तबलिगी जमातने माहिती लपवून ठेवल्याचेही आरोप करण्यात आले. आता या प्रकरणातील १० परदेशी नागरिकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.