नांदगाव खंडेश्वर (अमरावती) : येथील कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन असलेल्या अजमत खान सत्तार खान (२९, नांदगाव खंडेश्वर) वार्ड क्रमांक २ मधील रहिवासी असलेल्या युवकाने कोविड केअर सेंटरमधील खिडकीच्या ग्रीलला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, कोविड केअर सेंटरजवळ बराच जनसमुदाय गोळा झाला होता. या संतप्त जमावाच्या प्रतिनिधीने या इमारतीत सीसीटीव्हीचे फुटेज बघितल्यावर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अमरावती येथे त्या युवकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी पूनम पाटील, तहसीलदार पी. झेड. भोसले, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, मुख्याधिकारी मीनाक्षी यादव, तालुका आरोग्य अधिकारी साहेबराव इंगळे हे घटनास्थळी दाखल झाले होते.
येथे पुण्यावरून आलेल्या २८ वर्षीय युवकाचा अहवाल २५ जून रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कात आलेले १६ जण शुक्रवारी सकाळी या कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन होते. आज येथील या युवकाचे आत्महत्या केल्याचे वृत्त शहरात धडकताच त्याच्या नातेवाईकांसह बरीच मंडळी घटनास्थळी पोहचली होती. हा इसम क्वारंटाइनमध्ये असताना त्याची आत्महत्या झालीच कशी व तेथे क्वारंटाईन असलेली मंडळी गावात फिरतातच कशी? या प्रकरणाला जबाबदार कोण? आदी सवाल उपस्थितांनी केल्याने काही काळ वातावरण तापले होते.
अन्य महत्वाच्या बातम्या...
५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा
लग्न सोहळ्यात वादग्रस्त हळदी समारंभामुळे आले विघ्न, तिघांवर गुन्हा दाखल
हृदयद्रावक! बंद फ्लॅटमध्ये दाम्पत्याची आत्महत्या; पोलिसांनी दरवाजा उघडताच ८ महिन्यांचे बाळ दिसले रांगताना
बापरे! आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून सावत्र बापाने केली मुलाची हत्या
भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला
नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न