CoronaVirus News : लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:32 AM2022-02-04T11:32:27+5:302022-02-04T11:40:05+5:30

CoronaVirus News : पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केलेल्या बोगस कोरोना लस सध्या विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

CoronaVirus News varanasi fake corona vaccine water glucose delhi kerala testing kit | CoronaVirus News : लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय

CoronaVirus News : लोकांच्या जीवाशी खेळ! पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केल्या बोगस कोरोना लस; 'या' राज्यात सप्लाय

googlenewsNext

नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 1,49,394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे देशभरात तब्बल 5 लाख लोकांना जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा 5,00,055 वर पोहोचला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. कोरोनाच्या संकटात बाजारात बोगस लस आणि टेस्टिंग किटचा सुळसुळाट झाला आहे. पाणी आणि ग्लुकोज भरून तयार केलेल्या बोगस कोरोना लस सध्या विकल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

दिल्ली आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कोरोना लस आणि टेस्टिंग किटचा सप्लाय केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीमध्ये एका फॅक्ट्रीवर छापा टाकण्यात आला, जिथे बनावट कोरोना लस, टेस्टिंग किट आणि रेमडेसिवीर इंजेक्शन हे मोठ्या प्रमाणात तयार केलं जात होतं. लस आणि इंजेक्शनमध्ये औषधाऐवजी पाणी आणि ग्लुकोज भरलं जात होतं. STF आणि IB ला जवळपास दीड वर्षांनी हे या बनावट लस आणि ते तयार करणारी फॅक्ट्री पकण्यात यश आलं आहे. 

4 कोटींच्या बोगस कोरोना लस, टेस्टिंग किट, रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त 

जवळपास चार कोटींच्या बोगस कोरोना लस, टेस्टिंग किट आणि रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आलं आहे. तसेच पॅकिंग मटेरियल आणि मशीनही ताब्यात घेण्यात आली. बनावट टेस्टिंग किट, कोविशिल्ड वॅक्सीन, जायकोव डी वॅक्सीन, पॅकिंग मशीनसह स्वॅब स्टिक जप्त करण्यात आली आहे. कसून चौकशी केली असता पकडण्यात आलेल्या राकेश थवानी याने याबाबत माहिती दिली. संदीप शर्मा, अरुणेश विश्वकर्मा आणि शमशेर यांच्यासोबत मिळून हे काम करत होता. नेटवर्कच्या मदतीने अनेक राज्यांत याचा सप्लाय केला जात होता. 

1550 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन सापडली 

1550 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन सापडली आहेत. ज्यामध्ये फक्त ग्लुकोज पावडर वापरण्यात आली होती. तर कोविशिल्डचं लेबल असलेल्या 720 लस सापडल्या आहेत. तर बोगस एंटीजन किटचे 432 बॉक्स असून एका बॉक्समध्ये 25 किट आहेत. या एका बॉक्सची किंमत 37500 रुपये आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. लाखो लोकांनी कोरोनावर मात केली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.
 

Web Title: CoronaVirus News varanasi fake corona vaccine water glucose delhi kerala testing kit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.