उल्हासनगर: कोरोनावर गुणकारी ठरलेल्या अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका महिलेला गुरवारी रात्री औषध व अन्न प्रशासन विभागाने अटक केली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून शहरात अशाप्रकारे आणखी रॅकेट कार्यरत असतील, या अंदाज व्यक्त करत यासंबंधी तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या ६ हजारपेक्षा जास्त झाली असून कोरोनावर गुणकारी ठरलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. कॅम्प नं-३ मनीषनगर परिसरात राहणारी एक महिला अॅक्टेमरा टोसिलीजुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार करीत असल्याची माहिती औषध व अन्न प्रशासन विभागाच्या निशिगंधा पाष्टे यांना मिळाल्यावर त्यांच्या पथकाने निता पंजवाणी यांच्या घरावर गुरवारी रात्री ९ वाजता धाड टाकली. निता पंजवाणी या सिपला कंपनीचे अॅक्टेमरा टोसीलीझुमॅब हे इंजेक्शन काळ्या बाजारात विकत होती. ४०,५४५ किंमतीचे इंजेक्शन तब्बल ६० हजार रुपयांना विकत असताना औषध व अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
निशिगंधा पाष्टे यांच्या तक्रारीवरून निता पंजवाणी यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शहरात असे इंजेक्शन काळ्या बाजारात विकणारे रॅकेट कार्यरत आहे का. या दृष्टिकोनातून पोलीस तपास करीत आहे. कोरोना रुग्णासाठी असे इंजेक्शन गुणकारी ठरले असून इंजेक्शनची काळाबाजार सुरू झाली. कार्यरत असलेले रॅकेट गरजूंची प्रचंड आर्थिक लूट करीत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने नुकताच पर्दाफाश करून सात जणांच्या टोळीला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आणखी बातम्या...
इराणच्या पॅसेंजर विमानाजवळ आली दोन अमेरिकन लढाऊ विमाने, थोडक्यात मोठा अपघात टळला
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान