नवी दिल्ली - दिल्लीपोलिस दलातील शिपाई अमित कुमार यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 31 वर्षीय अमितचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अमित कुमार हा राष्ट्रीय राजधानीतील पहिला पोलिस कर्मचारी होता, त्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो भरत नगर पोलिस ठाण्यात तैनात होता. मंगळवारी अमितकुमारची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
कुमारचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते व बुधवारी त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून कुमार कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सह पोलिस आयुक्त (उत्तर रेंज) मनीष अग्रवाल, पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) विजयंत आर्य आणि जिल्ह्यातील इतर अधिकारी यांनी कुमार यांना पंजाबी बाग स्मशानभूमीत अंतिम निरोप दिला. सहआयुक्त पोलिस आयुक्तांनी कुमार यांच्या कुटूंबियांशी संवाद साधला आणि या दुःखद घटनेत शोक व्यक्त केला. अशी माहिती झी न्यूजने दिली आहे.
Coronavirus :...म्हणून पत्नीने केली पतीची हत्या, कोरोनाने मृत्यू झालं सांगण्याचा केला प्रयत्न