धक्कादायक! पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पसार; प्रशासनाचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 03:22 PM2020-03-29T15:22:19+5:302020-03-29T17:59:51+5:30

रुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांसह डॉक्टरांना आणि पालिका प्रशासनाला खूप शोधाशोध करावी लागली.

CoronaVirus Positive patient run away from hospital; caught after 5 hours hrb | धक्कादायक! पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पसार; प्रशासनाचे धाबे दणाणले

धक्कादायक! पॉझिटिव्ह रुग्ण हॉस्पिटलमधून पसार; प्रशासनाचे धाबे दणाणले

Next

इंदौर : देशात कोरोनाची साथ पसरल्याने लॉकडाऊन सुरु आहे. तर जवळपास १०५० वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली आहे. यापैकी २७ जणांचा मृत्यू झाला असून ८६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत असताना कोरोनाची लागण झालेले रुग्णच उपचारांवेळी पळून जात असल्याने खळबळ उडाली आहे. 


हा धक्कादयक प्रकार इंदौरमध्ये घडला आहे. एमआरटीबी हॉस्पटलमध्ये भरती असलला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तेथील डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला. हॉस्पिटलमधून पळालेला हा रुग्ण अल्पसंख्यांक समाजातील असून ४२ वर्षांचा आहे. हा रुग्ण पळाल्याने एकच खळबळ उडाली. 


या रुग्णाला पकडण्यासाठी पोलिसांसहडॉक्टरांना आणि पालिका प्रशासनाला खूप शोधाशोध करावी लागली. तबब्ल ५ तासांनी या रुग्णाला पुन्हा पकडण्यात आले. त्याला इंदौरच्या खजराना भागातून पकडण्यात आले. आता त्याच्या लपून बसण्यामुळे संपूर्ण परिसर सॅनिटाईज करावा लागत आहेत. रुग्णाला पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने आरोग्य विभाग योग्य प्रकारे उपचार करत नसल्याचा आरोप केला आहे. 


दरम्यान मध्य प्रदेशमध्ये आज पर्यंत ३९ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारीही ५ नवीन रुग्ण सापडले आहेत. यामध्ये १७ वर्षांच्या मुलीचाही सहभाग आहे. यापैकी ४ रुग्ण एकट्या इंदौरमधीलच आहेत. तर ३९ पैकी २० रुग्णही इंदौरचे आहेत. आज सापडलेले पाचही रुग्ण स्थानिक असून त्यांनी कुठेही इतरत्र प्रवास केला नव्हता. यामुळे आज कोरोनाचा रुग्ण पसार झाल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. 

Web Title: CoronaVirus Positive patient run away from hospital; caught after 5 hours hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.