ठळक मुद्देकोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतानाच मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
मुंबई - कोरोनाच्या लढाईत समर्थपणे सामील झालेले पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असतानाच मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी येथील रहिवासी होता.
संंबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.