उत्तरपूर्व दिल्लीतील अशोक विहारमध्ये ही धक्कादायक घटना घडली. ३५ वर्षीय महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. इतक्यावरच न थांबता जगावर आलेल्या कोरून संकटाचा तिने फायदा घेत करोना व्हायरसमुळे पतीचा मृत्यू झाला असे भासविण्याचा प्रयत्न केला. मृत पतीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यातून श्वास कोंडल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
शरत दास (४५) असे मृताचे नाव असून तो दुकानदार होता. त्याच्या पत्नीचे नाव अनिता दास. २ मे रोजी सकाळी उठल्यानंतर अनिताने शेजाऱ्यांना आपले पती बेशुद्ध पडले असून कुठलीही हालचाल करत नाही असं सांगितले. कोरोना व्हायरसमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा शक्यता असल्याचं तिने सांगितली. शेजाऱ्यांनी लगेच पोलिसांना याबद्दल कळवले. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.
Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन
‘बाप’ फोटो... लेकीच्या खांद्यावरचे तारे वडिलांनी न्याहाळले, नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले
बाबरी मशीद प्रकरणी खटल्याची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करा - सुप्रीम कोर्ट
दिल्ली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर अनिताकडे चौकशी केली. अनिता पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकली नाही. शरत दास आजारी नव्हते, त्यांची प्रकृती उत्तम होती असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले. कोरोनाच्या टेस्टबाबत पोलिसांनी रिपोर्ट दाखवायला सांगितला. त्यावेळी अनिताकडे कुठलेही कागदपत्र नव्हते. ४ मे रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर गुदमरुन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अनिताला चौकशीसाठी बोलावले. पोलीस चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. आपले दुसऱ्या एका व्यक्तीवर प्रेम आहे. अडथळा दूर करण्यासाठी आणि नवऱ्यापासून सुटका करुन घेण्यासाठी त्याची हत्या केल्याचे तिने कबूल केले. मृत शरतला अनिताच्या प्रेमसंबंधांबद्दल माहिती होती. त्यावरुन त्यांच्यात सतत भांडणे सुद्धा होत होती. १ मे रोजी रात्री शरत झोपल्यानंतर तिने प्रियकर संजयला घरी बोलावले आणि दोघांनी ब्लॅंकेटच्या मदतीने गळा आवळून शरतची हत्या केली.