उत्तर प्रदेशात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत आहे. राज्य सरकार आणि प्रशासन कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला जो 14 एप्रिलपर्यंत सुरू असणार आहे. दरम्यान, यूपीच्या हाथरस जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे की, जवळपास 35 संभाव्य कोरोनाबधित क्वांरटाईन केंद्रातून पळून गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हाथरस जिल्ह्यातील सादाबाद पोलीस ठाण्याााच्या हद्दीतील कसबा बिसावर शहराच्या प्राथमिक शाळेत इतर राज्यांतील 35 जणांना अलग ठेवण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्व लोक रात्री पळून गेले. ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याया निदर्शनास येताच ते आता कारवाईबाबत बोलत आहेत.
हाथरस पोलिस ठाण्यातील सादाबाद भागातील कसबा बिसावर शहरातील प्राथमिक शाळेत इतर राज्यांतील लोक अलग ठेवण्यात आले होते. या लोकांच्या भोजन व इतर व्यवस्थेसाठी जिल्हा सचिवांनी पंचायत सचिवांना ड्युटीवर तैनात केले होते. परंतु रात्री जेवणानंतर पंचायत सचिवांनी शाळा सोडल्याबरोबरच या लोकांनी संधीचा फायदा घेत पळ काढला. यापैकी 6 जण परत आले असून उर्वरित 29 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.