सदानंद नाईक उल्हासनगर : बायोस्वॅब परदेशी कंपनीच्या नावाने बनावट कोरोना चाचणीचे स्वॅब स्टिकचे पॅकिंग करणाऱ्या मनीष केसवानी याला उल्हासनगर पोलीसानी शुक्रवारी अटक केली. स्वॅब स्टिक कुठे बनवून वितरित केल्या आदींचा उलघडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगर खेमानी ज्ञानेश्वरनगर झोपडपट्टीतील काही घरात चक्क कोरोना चाचणीसाठी लागणाऱ्या स्वॅब स्टिकचे पॅकिंग केले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यावर एकच खळबळ उडाली. महापालिकेच्या अतिरिक आयुक्त करुणा जुईकर यांनी याप्रकाराची त्वरित दखल घेत, पोलिसांसह घटनास्थळ गाठून उघड्यावर पैकिंग केलेल्या हजारो स्वब स्टिक ताब्यात घेतल्या. तसेच अन्न औषध व प्रशासन विभागाला याबाबतची माहिती देऊन, कारवाई करण्याचे सुचविले. अन्न औषध व प्रशासन विभागाचे निरीक्षक विलास तासखेडकर यांच्या तक्रारीवरून मनीष केसवानी यांच्या विरोधात उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शुक्रवारी मनीष केसवानी याला अटक केली असून स्वॅब स्टिक बनविणारे व स्टिकचे वितरण कुठे कुठे केले. याबाबचा खुलासा उघड होणार आहे.
बनावट स्वॅब स्टिक बनविणाऱ्या कंपनीचा बुरखा उघड होणार?
ऐन कोरोना महामारी वेळी हजारो नागरिकांच्या जीवितांशी खेळून बायोस्वॅब परदेशी कंपनीच्या नावाने बनावट कोरोना चाचणी स्वॅब स्टिक बनविणाऱ्या कंपनीचा बुरखा फाडण्याची मागणी होत आहे. यामागे मोठे रैकेट असून मोठे मासे फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या स्वब स्किटचा राज्यासह देशात वितरण झाले का? याबाबत चौकशी होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.