शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

लाचखोर पोलीस एसीबीच्या जाळ्यात; १ लाखाची लाच घेताना फौजदारास रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 7:05 PM

Bribe Case : योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.  

चाळीसगाव जि. जळगाव :  दोषारोपपत्र लवकर पाठवण्याच्या मोबदल्यात एक लाखांची लाच (Bribe) घेणाऱ्या मेहुणबारे ता. चाळीसगाव येथील पोलीस ठाण्यातील फौजदारास रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी २ वाजता पोलीस (Police) ठाण्याच्या आवारातच ही कारवाई करण्यात आली. योगेश जगन्नाथ ढिकले (३२, रा.जिजाई नगर, तिरपुळे रोड,मेहुणबारे. ता.चाळीसगाव) असे या लाचखोर फौजदाराचे नाव आहे.

 तक्रारदाराविरुद्ध मेहुणबारे पोलीस ठाण्यात २९ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल होता. याबाबत दोषारोपपत्र लवकर पाठवून मदत करायची आणि पोलीस ठाण्यात दिलेली हजेरी माफ करण्याच्या मोबादल्यात साडेचार लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. यात एक लाखाच्या रक्कमेवर तडजोड झाली.  ही रक्कम ढिकले याने गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या आवारातच घेतली आणि दुसऱ्याच क्षणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याच्यावर झडप घातली.

 डीवायएसपी शशिकांत एस.पाटील, निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, .सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, पोना. मनोज जोशी, जनार्दन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर व प्रदीप पोळ यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसJalgaonजळगावAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग