डेट्रॉईट - विमानात हस्तमैथून करणाऱ्या एका जोडप्याला मिशीगन येथून अटक करण्यात आलीये. प्रवास सुरु झाला तेव्हा ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. असे असताना त्यांनी चार चौघात हस्तमैथून केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.
लॉस एन्जिलस येथून टेक ऑफ झालेल्या डेल्टा फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला आहे. हे विमान डेट्रॉइट येथे लँड झाल्यावर त्यांना अटक केली गेली. याविषयी अधिक माहिती देताना विमानतळाचे अधिक्षक म्हणाले की , ‘ते दोघेही एकमेंकाना ओळखत नसून विमानातच त्यांची ओळख झाली आहे. महिलेने हस्तमैथून करण्यात पुढाकार घेतला होता. त्यानंतर पुरुषानेही चारचौघात हस्तमैथून केले.’
महिलेचे वय ४८ वर्ष असून २८ वर्षीय तरुणासोबत तिने असा किळसवाणा प्रकार केलाय. याप्रकरणी इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमानात लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, अनेक कुटुंब प्रवास करत असतात. त्यामुळे असा प्रकार सगळ्यांसमोर होत असताना प्रत्येकालाच लाजिरवाणं वाटतं. अशा प्रकारावर बंदी घातलीच पाहिजे. पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन हा कायदा प्रत्येक ठिकाणी केला गेला पाहिजे असंही काही प्रवाशांनी म्हटलं आहे. विमानात आणि इतर प्रवासातही असे अनेक प्रकार घडत असतात. अनेक जोडपे प्रवासादरम्यान एकमेंकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही गोष्ट फार चुकीची असून अशाप्रकारांवर आळा घातला पाहिजे ,अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत.
सौजन्य- www.thesun.co.uk