भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेवरील बाडमेर जिल्ह्यातील भारत-पाक सीमेवर बीएसएफ जवानांनी एका प्रेमी युगुलाला बॉर्डर क्रॉस करताना पकलं आहे. भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेच्या १७० मीटर अंतरावर दोघांना पकडण्यात आलंय. त्यांना बीएसएफ जवानांनी पोलिसांच्या ताब्यात दिलंय. पोलीस दोघांची चौकशी करत आहेत. दोघांचंही वय १८ वर्षे असून दोघेही विवाहित आहेत. असं सांगितलं जात आहे की, बॉर्डर क्रॉस करून दोघेही पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवर प्रेमी युगुलाला पकडण्याची ही घटना बुधवारी समोर आली होती. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत प्रेमी युगुलाला आंतरराष्ट्रीय सीमा पार करणार इतक्यात पकडलं. सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितलं की, बुधवारी दुपारी ३ वाजता भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर एक तरूण आणि तरूणीला पाकिस्तानकडे जाताना पकडण्यात आलं.
पकडण्यात आलेल्या तरूण तेजाराम सेवडाचा राहणारा आहे तर तरूणी सोनी सोमराडची राहणारी आहे. दोघांचंही वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न झालेलं आहे. पण दोघांमध्ये प्रेम प्रकरण आहे. त्यामुळे ते देश सोडून पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होते. मात्र, ते बॉर्डर क्रॉस करणार इतक्यात बीएसएफच्या जवानांनी त्यांना अटक केली. बीएसएफकडून प्राथमिक चौकशी केल्यावर त्यांना बाडमेर पोलिसांकडे सोपवण्यात आलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.