ठळक मुद्देकोर्टाने नीरव मोदीच्या न्यायालयीन कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
लंडन - पंजाब नॅशनल बँकेत कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला पुन्हा एकदा लंडनच्या कोर्टाने धक्का दिला आहे. कोर्टाने नीरव मोदीच्यान्यायालयीन कोठडीत २२ ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.
त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि परदेशात फरार असलेला नीरव मोदी याच्याभोवती भारतीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. स्वित्झर्लंड येथे नीरव मोदी आणि त्याची बहिण पूर्वी मोदीशी संबंधित चार बँक खाती गोठवण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये 283.16 कोटी रुपये जमा होते. नीरव मोदीवर पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावल्याचा आरोप आहे.