राजस्थान - सोशल मीडियावर भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर करणे अभिनेत्री पायल रोहतगी हिला चांगलेच महागात पडले होते. वादग्रस्त पोस्ट केल्याबद्दल पायल हिला बुंदी पोलिसांनी १५ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. काल न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला असून तिचा कारागृहातील मुक्काम लांबला होता. मात्र, आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपये अशा दोन जातमुचलक्यांवर पायलची सुटका केली आहे. अटक केल्यानंतर पायल हिने न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता. मात्र, बुंदी न्यायालयाने तिचा अर्ज काल फेटाळला होता असून २४ डिसेंबरपर्यंत तिची रवानगी कारागृहात केली आहे. तिला रविवारी अहमदाबाद येथील तिच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि गांधी-नेहरू कुटुंबातील सदस्यांसंदर्भात पायलने आपत्तीजनक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील बुंदी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. याच महिन्यात तिला एक नोटीस देखील देण्यात आली होती. दरम्यान, बुंदी पोलीसांनी पायलला एसीजेएम न्यायालयात हजर केले होते. उभयपक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर एसीजेएम हनुमान जाट यांनी पायलची याचिका फेटाळून लावली. तसेच २४ डिसेंबरपर्यंत तिची कारागृहात रवानगी केली. प्रदेश युवा काँग्रेसचे महासचिव आणि बुंदी येथील रहिवासी चर्मेश शर्मा यांनी पायलविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
अभिनेत्री पायल रोहतगीला कोर्टाने केला जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 4:29 PM
१० ऑक्टोबर रोजी राजस्थानमधील बुंदी पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
ठळक मुद्देअटक केल्यानंतर पायल हिने न्यायालयाकडे जामीन मिळविण्यासाठी अर्ज सादर केला होता.आज न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपये अशा दोन जातमुचलक्यांवर पायलची सुटका केली आहे.