जयंत धुळप
अलिबाग - सहाय्यक पोलीस निरिक्षक अश्विनी बिंद्रे-गाेरे हत्या प्रकरणातील आराेपींपैकी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांच्या जामीन अर्जावर आरोपींच्या वकिलाने पुढील तारीख मागितली. मात्र, कोर्टाने तारीख देण्यास नकार दिला. परिणामी आराेपींच्या वकीलानी अर्ज मागे घेतला. मात्र, कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला आहे.
अश्विनी बिंद्रे-गाेरे हत्या प्रकरणी बुधवारी येथील जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायलयाधीश आर जी मलशेट्टी यांच्या कोर्टात झाली त्यावेळी हा निर्णय देण्यात आला.सरकारी वकील संतोष पवार यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान, राजू गोरे यानी मृत अश्विनी बिंद्रे-गाेरे यांच्या वस्तूंची डीएनए टेस्ट खाजगी लॅबकडून करुन घ्याव्या अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे पनवेल कोर्टाने त्या वस्तू खाजगी 'ट्रथ 'या लॅबकडे वर्ग केल्या आहेत. त्याची टेस्ट खाजगी लॅबकडून करून घेऊ नये असा अर्ज आरोपी अभय कुरुंदकर यांनी वकीलामार्फत सत्र न्यायालयात दाखल केला होता. तो अर्ज ही न्या. आर. जी.मलशेट्टी यानीे फेटाळला असून पनवेल कोर्टाचा खाजगी ट्रथ लॅबमध्ये डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. आरोपीने कारागृह बदलाची मागणी केली आहे. त्यांची सुनावणी झाली असून त्यावर अंतिम निर्णय न्यायालय २ जानेवारी 2019 राेजी देणार आहे.