मुंबई : मुंबईतील बार वसुलीप्रकरणी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात मोठी खेळून वाझेने थेट ईडीलाच प्रस्ताव दिला असून मनी लाँड्रिंग प्रकरणी माफीचा साक्षीदार बनविण्याची मागणी केली आहे. त्यातच वाझेने विशेष न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. त्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली असून बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे हा या संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहे, असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मागच्या सुनावणीत विशेष पीएमएलए न्यायालयासमोर युक्तिवाद करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. न्यायालयाने ईडीच्या आरोपपत्राची दखल घेत त्याच्याविरुद्ध प्रक्रिया जारी केल्यानंतर वाझेने विशेष पीएमएलए कोर्टाचे न्या. राहुल रोकडे यांच्याकडे वकील सजल यादव आणि हर्ष गांगुर्डे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी तिसरी अटक
तळोजा कारागृहात बंद असलेल्या बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अँटिलिया स्फोटकी प्रकरण आणि मनसुख हिरेन खून प्रकरणाच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रथम अटक केली होती. वकील यादव यांनी मनी-लाँड्रिंग प्रकरणात वाझेसाठी जामीन मागितला, कारण त्याला ईडीने अटक केली नाही आणि एजन्सीने तपास पूर्ण केला आहे आणि आरोपपत्र दाखल केले आहे आणि त्यामुळे त्याला जामीन मिळण्याचा हक्क आहे. या जामीन अर्जाला विरोध करताना ईडीचे वकील सुनील गोन्साल्विस वाझे एक प्रभावशाली व्यक्ती आहे आणि अँटिलिया स्फोटकांच्या भीतीसह अनेक प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचे म्हणाले होते. ईडीने म्हटले आहे की, जर वाझेला जामीन दिला गेला तर तो साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो आणि परिणामी तपासात अडथळा आणू शकतो, कारण तो एक प्रभावशाली व्यक्ती आहे, ज्याचे उच्च पदावरील राजकीय व्यक्ती आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध होते.