काशीराम म्हांबरे
म्हापसा - एका प्रलंबित सुनावणी प्रकरणात म्हापसा न्यायालयातील महिला कर्मचाऱ्या याला धमकी देऊन तिचा कारने पाठलाग करणाऱ्या दोन संशयित सायतो लोबो तसेच झेवियर लोबो ( दोघेही सांवतावाडो- कळंगुट) यांनी पर्वरी पोलिसांनी अटक केली आहे. या संबंधी येथील प्रथम वर्ग न्यायालयातील न्यायाधिशांनी तक्रार दाखल केली होती. केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाईकरुन त्यांना अटक करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदरची तक्रार बुधवारी रात्री दाखल करण्यात आली होती.
आरंभी त्या महिला कर्मचाºयाला न्यायालयाच्या आवारात धमकी देण्यात आली. त्यानंतर न्यायालयातून पर्वरी येथील आपल्या गाडीनेघरी जाणाºया त्या महिला कर्मचाऱ्याचा पाठलाग केला होता. घडलेला प्रकार कर्मचाºयाने न्यायाधिशाच्या नजरेस आणून दिला. एका प्रलंबीत याचिकेच्या मुद्यावरून ही धमकी देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दोघांचीही चौकशी केल्यानंतर त्यामागील सत्य समोर येणार आहे. दरम्यान दोघाही संशयितांना उपचारासाठी सध्या जीएमसीत दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पर्वरी पोलीस स्थानकाच्या उपनिरीक्षक प्रणीता मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत.