उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर सापडलेल्या स्फोटकांसह स्कॉर्पिओ आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी NIA जोरदार तपास करत आहेत. NIA याप्रकरणी सचिन वाझेंनी अटक केली असून दुसऱ्यांना कोर्टाने NIA रिमांड दिला आहे. आता १ तासापासून NIA चं बीकेसी परिसरात मिठी नदी पात्रात सर्च ऑपरेशन सुरु आहे. त्यावेळी 1 सीपीयू, डिव्हीआरचे काही पार्टस, २ नंबरप्लेट आढळुन आल्या आहेत. त्यामुळे NIA च्या हाती मोठे पुरावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
NIA ची टीम सचिन वाझे यांना घेऊन १ तासाभरापूर्वी मिठी नदी परिसरात पोहचले असून काही मजूर मिठी नदी पात्रात उतरले असून मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने त्यांना सीपीयू, डीव्हीआर मशीन आणि गाड्यांचे दोन नंबर प्लेट्स आढळून आल्या आणि त्या त्यांनी बाहेर काढल्या. वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स अथवा इतर ठिकाणच्या नष्ट केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा हा डीव्हीआर असण्याची शक्यता आहे. या तांत्रिक वस्तूंतून डेटा गोळा करून पुन्हा मिळवून जाऊन तो पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. मात्र, याआधी देखील NIA ची टीम सचिन वाझे यांनी वांद्रे परिसरातील खाडीजवळ तपासासाठी घेऊन गेले होते. महत्वाचे म्हणजे या सर्च ऑपरेशनच्या वेळी NIA चे एसपी विक्रम खलाटे देखील टीम सोबत हजर आहेत.
मनसुख हिरन यांची ठाण्याच्या गायमुख परिसरात हत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह रेती बंदर येथील खाडीत फेकण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यात, ठाणे येथील प्रभारी वरिष्ठ निरिक्षकाने त्यांना रेती बंदर परिसरात आणण्यास मदत केल्याचा संशय एनआयएला असून, त्या दिशेने तपास सुरू आहे. एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. गायमुख येथे बराच वेळ त्यांचे वाहन थांबले होते. याच ठिकाणी त्यांची हत्या केल्याचा संशय एनआयएला आहे. तेथून त्यांचा मृतदेह रेतीबंदरच्या दिशेने नेला. यात, वाटेत कोणी अडवू नये म्हणून ठाण्यातील एक वरिष्ठ निरीक्षकही वाहनात उपस्थित होते. या अधिकाऱ्यालाही यात अटक होण्याची शक्यता आहे.